अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र अनूप्रवर्तन दिनानिमित्त नांदेडमध्ये हजारोंच्या उपस्थितीत भव्य महावंदना समारंभ संपन्न
नांदेड, २ ऑक्टोबर :
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसमक्ष बौद्ध धम्म स्वीकारला. या ऐतिहासिक घटनेच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त, नांदेडकरांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, रेल्वे स्टेशनसमोर भव्य महावंदना समारंभ आयोजित करण्यात आला. सकाळी ६:०० वाजता पूजनीय भिक्खु संघाच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने उपस्थित उपासक-उपासिकांच्या शिस्तबद्ध सहभागात महावंदना अत्यंत श्रद्धेने पार पडली.
सलग तिसरे वर्ष: यशस्वी आयोजन
या भव्य समारंभाचे हे सलग तिसरे वर्ष असून यंदाही कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी महाकारूणिक तथागत भ. बुद्ध, चक्रवर्ती राजा सम्राट अशोक व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
श्रद्धेय भिक्खु पय्यारत्न महाथेरो यांनी उपस्थितांना त्रिसरण आणि पंचशील प्रदान केले. त्यानंतर भिक्खु संघाद्वारे महावंदना पार पडली.
प्रवचणनाने डोळे पाणावले
महावंदनेनंतर श्रद्धेय भिक्खु विनयप्रिय बोधि महाथेरो यांनी समयोचित प्रवचन केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतरामागची भूमिका, आणि त्या वेळी मिळालेला जनतेचा भावनिक व अभूतपूर्व असा प्रतिसाद प्रभावी शैलीत मांडला. त्यांच्या भावपूर्ण शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले.
आयोजनाच्या यशामागे तरुणांची मोठी साथ
या यशस्वी आयोजनामध्ये महाविहार, बावरीनगर दाभड (नांदेड) येथील भिक्खु बुद्धभूषण यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अनेक आंबेडकरी तरुणांनी सढळ हाताने सहकार्य केले. यामुळे संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी झाला, अशी भावना भिक्खु विनयप्रिय बोधि महाथेरो यांनी व्यक्त केली.
उपस्थित भिक्खु संघ व मान्यवर
या प्रसंगी पूजनीय भिक्खु विनयप्रिय बोधि महाथेरो, भिक्खु पय्यारत्न महाथेरो, भिक्खु अस्सजी थेरो, भिक्खु संघपाल, भिक्खु बुद्धभूषण, भिक्खु शिलवान, भंते संघपाल, तसेच भिक्खुणी चारूशीला, श्रामणेर संघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.शहरातील अनेक प्रतिष्ठित उपासक-उपासिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावली.
सामाजिक परिवर्तनाचा संदेश
धम्मचक्र अनूप्रवर्तन दिनाच्या निमित्ताने झालेला हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता, सामाजिक परिवर्तन, समता व बंधुत्वाचा संदेश देऊन गेला.
उपस्थित सर्वांच्या अनुमोदनाने कार्यक्रम संपन्न झाला
हा कार्यक्रम यशस्वी करन्या साठी योगेश सोनाळे, दिपक शिराढोनकर, प्रशिक गायकवाड, रोहण कहाळेकर,किरण सदावर्ते, आनिकेत लोणे, लक्ष्मण वाठोरे,जयदिप पैठणे,जय लव्हाळे, लखन जोगदंड,राजु बोडके, संजय सोनकांबळे,अमोल महिपाळे, आकाश भोरगे,जळबा सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment